हिंगोली जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; १५ पोलीस अधिकारी बदलीने नव्या ठिकाणी नियुक्त

हिंगोली जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; १५ पोलीस अधिकारी बदलीने नव्या ठिकाणी नियुक्त

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. ४ जून : हिंगोली जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या १५ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (न) (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, विशेष शाखा, वाहतूक शाखा, नियंत्रण कक्ष आणि सायबर पोलीस ठाण्यांमध्ये या बदल्या करण्यात आल्या असून काही अधिकारी बदलीने नव्याने हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे :
• पोलीस निरीक्षक संदीप खंडेराव मोदे यांची हिंगोली शहर पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा, हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे.
• पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह बहादुरसिंह ठाकूर यांची नव्याने हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
• पोलीस निरीक्षक विष्णुकांत तुकाराम गुट्टे यांची आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यातून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
• पोलीस निरीक्षक श्यामकुमार परमेश्वर डोंगरे यांची हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
• पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश मारोतराव माकोडे यांची कळमनुरी पोलीस ठाण्यातून पोलीस नियंत्रण कक्ष, हिंगोली येथे बदली झाली आहे.
• पोलीस निरीक्षक जमीर अब्दुलगनी नाईक यांची जिल्हा विशेष शाखेतून कळमनुरी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
• पोलीस निरीक्षक शरद सुभाष मरे यांची शहर वाहतूक शाखा, हिंगोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
• पोलीस निरीक्षक शेख गफार शेख खलील यांची पोलीस नियंत्रण कक्षातून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे :
• सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास महाजन निरदोडे यांची कुरुंदा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
• सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिवाजी पुरी यांची नव्याने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
• सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम उद्धव जाधव यांची हट्टा पोलीस ठाण्यातून वसमत शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
• सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आनंदराव बोरकर यांची नव्याने हट्टा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
• सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब हिराजी शेख यांची नव्याने औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
• सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत वैजनाथ पुणे यांची नव्याने कळमनुरी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
• सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत शिवलिंग आरसेवार यांची सायबर पोलीस ठाणे तथा स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
तात्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश
बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन कार्यभार स्वीकारावा तसेच त्याबाबतचा अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم