दगडाने ठेचून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01जुलै 2026
हिंगोली, प्रतिनिधी : दगडाने ठेचून खून केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या सत्र प्रकरणात सरकार पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. हा निकाल विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्रीमती एस. एन. माने यांनी दि. 24 जून 2026 रोजी दिला.
प्रकरणातील माहितीनुसार, फिर्यादीने दि. 25 मार्च 2025 रोजी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले होते की, दि. 24 मार्च 2023 रोजी रात्री सुमारे 10.00 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान तिचे पती बाजाराच्या निमित्ताने कळमनुरी येथे आले असता त्यांचा गणपतसिंह हत्यारसिंह टाक याच्यासोबत पैशाच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपीने फिर्यादीच्या पतीच्या डोक्यात दगड मारून त्यांचा खून केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या फिर्यादीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे सत्र खटला क्रमांक 65/2025 म्हणून चालविण्यात आले. खटल्यादरम्यान आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 103(1) अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
आरोपी गणपतसिंह हत्यारसिंह टाक याच्या वतीने ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी न्यायालयात बाजू मांडत सविस्तर युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षाला आरोप संशयातीतरीत्या सिद्ध करण्यात अपयश आल्याचे नमूद करत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख व ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावीपणे कामकाज पाहिले व युक्तिवाद केला.
त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित (उर्फ शुभम) देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. रजत देशमुख, ॲड. अविनाश राठोड, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. सुमित सातव, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. लखन पठाडे, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले, ॲड. शिवम देशमुख, ॲड. प्रिया कुरील, ॲड. हरपालसिंग सेठी आणि ॲड. महावीरसिंग चौहान यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق