24 तासांत अल्पवयीन मुलीचा शोध; हिंगोली ग्रामीण पोलिसांची तत्पर कारवाई
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे
07 जुलै 2026
प्रतिनिधी : हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराना नगर, कारवाडी येथून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अवघ्या 24 तासांत शोध लावण्यात हिंगोली ग्रामीण पोलिसांना यश आले. पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे
यांच्या तत्पर तपासामुळे मुलगी सुरक्षितरित्या शोधण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजू शामराव सावंत (वय 39), रा. सुराना नगर, कारवाडी, ता. जि. हिंगोली यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी नमूद केले की, त्यांची मुलगी (वय 13 वर्षे 10 महिने) ही 2 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता मैत्रिणीकडे अभ्यासासाठी जात असल्याचे आईला सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही.
कुटुंबीयांनी संबंधित मैत्रिणीच्या घरी तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा अपर पोलीस अधीक्षक. कमलेश मीना
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे
यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासामध्ये पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले पोहका बाळासाहेब खोडवे असलम गारवे सुधीर ढेंबरे
राजकुमार जमदाडे यांनी
तांत्रिक बाबींचा वापर, माहिती संकलन आणि शोधमोहीम राबवत पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध लावला. त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला.
हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या तत्परता, दक्षता आणि प्रभावी तपासामुळे अल्पवयीन मुलीचा अल्पावधीत शोध लागल्याने पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे ह्या करत आहेत
إرسال تعليق