हिंगोली शहर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नारायणराव देशमुख यांची रुजू; कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर

हिंगोली शहर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नारायणराव देशमुख यांची रुजू; कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. 30जुलै : 
हिंगोली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नारायणराव देशमुख यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन औपचारिक सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक नानाराव पोले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उजगरे, अंमलदार वसियोद्दीन, सुनिल नाईक, लक्ष्मण भगत, संतोष बंडे, संजोग वाघमारे, शिवाजी घोगरे, संघपाल पंडित, पूजा पवार तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायणराव देशमुख यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे, प्रलंबित गुन्ह्यांचा जलद निपटारा करणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व उत्तरदायी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
देशमुख यांनी नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तत्पर सेवा, संवेदनशील वर्तन आणि गुन्हे प्रतिबंधावर विशेष भर दिला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याने जबाबदारीने काम करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नारायणराव देशमुख यांच्या नियुक्तीमुळे हिंगोली शहर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा गतीने होण्यास आणि नागरिकाभिमुख पोलीस प्रशासनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने