31 वर्षे 11 महिने 18 दिवसांची प्रदीर्घ सेवा पूर्ण; श्रीमती पंचफुला इंगळे यांचा भावपूर्ण सेवानिवृत्ती सत्कार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
फाळेगाव, दि. 01 ऑगस्ट
:आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा" या विचाराला आयुष्यभर कृतीत उतरवत 31 वर्षे 11 महिने 18 दिवसांची प्रदीर्घ व निष्ठापूर्ण सेवा पूर्ण केलेल्या एलएचव्ही (LHV) श्रीमती पंचफुला नारायण इंगळे या आज सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्त फाळेगाव येथे दुपारी ठीक 2 वाजता त्यांचा भावपूर्ण सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिवसे हे होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ठोके सिस्टर यांनी केले.
यावेळी आरोग्य सेविका सपना चाटसे मॅडम, सूर्यतल, इंगोले, कांबळे, ठोके, सीएचओ सेवाले सर, कोळेकर सर तसेच आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवानिवृत्तीप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्रीमती पंचफुला इंगळे म्हणाल्या की, "आपण आपल्या कामाशी नेहमी प्रामाणिक असले पाहिजे. प्रामाणिकपणे सेवा दिल्यास कोणतीही अडचण येत नाही. माझ्या सेवाकाळात सर्व सहकाऱ्यांनी मला नेहमीच मोलाची साथ दिली आणि सहकार्य केले. त्याबद्दल मी सर्वांची मनःपूर्वक ऋणी आहे."
कार्यक्रमाच्या शेवटी मुनीर पठाण यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाला गावातील महिला, पुरुष तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्रीमती पंचफुला नारायण इंगळे यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि लोकाभिमुख आरोग्य सेवेबद्दल त्यांचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा