डीजेच्या दणदणाटात तरुणाचा मृत्यू; हिंगोली ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे

डीजेच्या दणदणाटात तरुणाचा मृत्यू; हिंगोली ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
२५ ऑगस्ट २०२६ 
हिंगोली : हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिग्रस फाटा येथे डीजेच्या संदर्भातील वादातून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डिग्रस फाटा, ता. जि. हिंगोली येथे ही घटना घडली. या घटनेत सोमनाथ रोहिदास भानावत (वय १९, रा. डव्हा, ता. मालेगाव, जि. वाशिम) याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अविनाश रोहिदास भानावत (वय २१, व्यवसाय शिक्षण, रा. डव्हा, ता. मालेगाव, जि. वाशिम) यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. ५५५/२०२६, कलम १०५, ३(५) भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात डीजे क्रमांक MH-03 CP 3463 चा चालक/मालक तसेच डीजे क्रमांक MH-04 DD 5528 यांच्याशी संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी गोविंद शरदअप्पा बिबेकर (वय २७, व्यवसाय व्यापार, रा. नखेगाव, ता. दारव्हा, जि. यवतमाळ) आणि वैष्णव विश्वनाथ शिंदे (वय १९, रा. केकतुमरा, ता. जि. वाशिम; सध्या रा. अनसिंग, ता. जि. वाशिम) यांना दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १.३६ वाजता अटक केली.
गुन्हा दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.३६ वाजता नोंद क्र. ३३ अन्वये दाखल करण्यात आला आहे.डीजेच्या दणदणाटात तरुणाचा मृत्यू; हिंगोली ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे  यांच्या मार्गदर्शनाखाली 
 घटनेचा पुढील तपास हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्याpsi   श्रीदेवी . वग्गे करीत आहेत.
डीजेच्या वापरासंदर्भातील वाद नेमका कशामुळे झाला आणि त्यातून सोमनाथ भानावत यांचा मृत्यू कशा परिस्थितीत झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे डव्हा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तपास पूर्ण झाल्यानंतर या घटनेमागील नेमके कारण आणि जबाबदारी स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم