प्रधान सचिवांच्या हिंगोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू
५ सप्टेंबर रोजी नियमित कामकाज; सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे विवेक गायकवाड यांचे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
04 सप्टेंबर 2026
हिंगोली : ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी हिंगोली जिल्हा दौरा नियोजित असल्याने जिल्हा परिषदेचे तसेच जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे कार्यालयीन कामकाज नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड (भाप्रसे) यांनी सर्व विभाग प्रमुख तसेच हिंगोली, औंढा (नागनाथ), कळमनुरी, वसमत आणि सेनगाव पंचायत समित्यांचे सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. प्रधान सचिवांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामकाज सुरळीत राहावे आणि आवश्यक प्रशासकीय तयारी पूर्ण असावी, यासाठी शनिवारचा दिवस नियमित कार्यालयीन दिवस म्हणून कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जे अधिकारी किंवा कर्मचारी सध्या रजेवर आहेत, त्यांना तात्काळ कार्यालयीन कर्तव्यावर उपस्थित होण्यासाठी आदेशित करावे, अशाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रधान सचिवांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान विविध विकासकामे, प्रशासकीय विषय तसेच ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित योजनांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी आवश्यक कागदपत्रे, अहवाल आणि प्रशासकीय तयारी पूर्ण ठेवण्याच्या दृष्टीने शनिवारी कार्यालयीन उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी तसेच पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
إرسال تعليق