बाळगल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना जामीन मंजूरअँड अजय उर्फ बंटी देशमुख

बाळगल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना जामीन मंजूर
अँड अजय उर्फ बंटी देशमुख 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
5 सप्टेंबर 2026 
हिंगोली : भारतीय बनावटीच्या चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या कथित नकली नोटा बाळगल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. देवानंद ऊर्फ सोनू शिवाजी जाधव व संस्कार अशोक खंदारे अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा र. नं. 824/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 180, 179 व 3(5) नुसार दि. 7 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षकांसह फिर्यादी व इतर पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, देवानंद ऊर्फ सोनू शिवाजी जाधव व त्याचा मित्र संस्कार अशोक खंदारे यांच्याकडे भारतीय चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या कथित नकली नोटा आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा कारवाई केली. या कारवाईदरम्यान एकूण ४,५०० रुपयांच्या कथित नकली नोटा जप्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
यानंतर अटक आरोपी देवानंद ऊर्फ सोनू शिवाजी जाधव व संस्कार अशोक खंदारे यांनी हिंगोली येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. आरोपींच्या वतीने ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी जामीन अर्जावर युक्तिवाद केला.
दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. आर. पमनानी यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज मंजूर केले.
आरोपींच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख व ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी न्यायालयात बाजू मांडली.
या प्रकरणात ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. मुदस्सीर अ. रहीम, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीज, ॲड. शिवम देशमुख, ॲड. संदीप डवले, ॲड. तुषार देशमुख, ॲड. सचिन सोनुने व ॲड. प्रिया मॅडम यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم