वाहतूक पोलिसाला लोखंडी कड्याने मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा
फाईन का मारली म्हणून पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
22 सप्टेंबर 2026
हिंगोली : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यावर लोखंडी कड्याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर २०२६) दुपारी घडली. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपील संजय जाधव (वय ३८), पोलीस अंमलदार शहर वाहतूक शाखा हिंगोली हे शासकीय कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी प्रमोद प्रल्हाद मांडगे (रा. पेडगाव वाडी, ता. जि. हिंगोली) याने गाडीवर दंडात्मक कारवाई का केली, असा जाब विचारत वाद घातल्याचा आरोप आहे.
याच वादातून आरोपी क्रमांक एकने लोखंडी कडे काढून पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळा, तोंड, छाती आणि पोटावर मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपी सतीष सुरेश पडोळे (रा. जडगाव), शाम साबळे (रा. पेडगाव वाडी) आणि शिवशंकर उर्फ बाबा सुभाष दराडे (रा. वंजारवाडा, हिंगोली) यांनी संगणमत करून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. घटनेनंतर कपील जाधव यांच्या तोंडी फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ७४९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) २०२३ मधील कलम १३२, १२१(१), ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २२ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंगोली येथे घडली. गुन्हा त्याच दिवशी सायंकाळी ५.२५ वाजता दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्याची कारवाई मपोह/५७८ इंगोले यांनी केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत. चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून
वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यावर कर्तव्य बजावत असताना झालेल्या या हल्ल्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या घटनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा