भटके-विमुक्त समाजाच्या उपविभागीय समितीवर गजानन कानडे यांची नियुक्ती
पोलीस अधिकारी पत्रकाराकडून सत्कार समारंभ
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
9 सप्टेंबर 2026
हिंगोली : भटके-विमुक्त समाजाच्या समस्या, तक्रारी तसेच अन्याय-अत्याचाराच्या घटनांचे निवारण करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उपविभागीय स्तरावरील समितीवर श्री. गजानन पांडुरंग कानडे आणि श्री. सचिन प्रकाशराव मस्के (रा. चिखलाघर, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी निवडीचे पत्र दिले
महाराष्ट्र 24न्यूजचे मुख्य संपादक पत्रकार सुधाकर वाढवे cjp जिल्हाध्यक्ष अमोल पाटील गणेशराव ठोके श्रीरंग पंडित गजानन कानडे यांचा सत्कार करताना
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. भाजप प्रदेश सचिव (VJNT महाराष्ट्र) संतोष दिगंबराव हादवे यांनी गजानन कानडे यांच्या सामाजिक कार्यातील सहभाग व समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन त्यांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर यांनी सचिन मस्के यांच्या नियुक्तीची शिफारस केली होती.
दोन्ही सदस्यांना भटके-विमुक्त समाजाच्या समस्या व तक्रारींचे निवारण, विकासविषयक बाबींमध्ये समन्वय साधणे तसेच समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांच्या निवारणासाठी समितीस सहकार्य करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कानडे यांचा सत्कार करताना पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे समंगा येथील ग्रामसेवक ठोके शिवाजी सरकटे. गोविंद सरपटे ज्ञानेश्वर सरकटे सुधाकर सरकटे
पंजाब सरकटे सुरेश रणबावळे कैलास सरकटे अनिल सरकडे
संतोष सरकटे गोपाल रेणके विश्वनाथ कानडे विलास कानडे धोंडबा कानडे गुलाब सरकटे
सतीश सरकटे यांच्यासह गावातील सत्कार करताना उपस्थित होते
सदर नियुक्त्या शासन निर्णयातील अटी व शर्तींच्या अधीन राहून करण्यात आल्या आहेत. या नियुक्तीमुळे भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांना प्रशासनाच्या पातळीवर प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा