अनेक दिग्गजांचे स्वप्नभंग, तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीवर महिलाराज (Dream breaking of many veterans, Mahilaraj on 56 gram panchayats in the taluka)
हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवारी दुपारी बारा वाजता हिंगोली येथील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली सोडण्यात आले.
हिंगोली तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायत आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे यात मातब्बराचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगले असून तालुक्यातील काही महत्त्वाच्या ग्रामपंचायत वर महिलाराज येणार आहे दरम्यान तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत केली.सदरील आरक्षण सोडत पुढील प्रमाणे
अनुसूचित जाती पुरुष
अभेरी ,उमरा ,कनका, काळकोंडी, खडकद ,खांबाळा भांडेगाव ,माळधामणी, वैजापूर
अनुसूचित जाती महिला
ईडोळी, कडती, कोथळज, खानापूर , गिलोरी,जोडतळा, ब्रह्मपुरी ,समगा, हनवतखेडा
अनुसूचित जमाती पुरुष
डिग्रस वाणी, देवठाणा, पेडगाव ,बोराळवाडी
अनुसूचित जमाती महिला
अधरवाडी, फाळेगाव ,राजूरा, लोहरा
नागरीकांचा मागास प्रवर्ग पुरुष
घोटा, पिपळखुटा, बळसोंड, सिरसम, मालवाडी, राहोली, लिंबाळा, लिबी ,लोहगाव, सतुंकपिपरी, सरकळी, दाटेगाव ,आडगाव ,जामठी खू, कळमकोंडा
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कनेरगाव नाका, कलगाव, थोरजवळा, टाकळी, पिंपळदरी, भटसावंगी, माळसेलु ,लिंबाळा, सावरगाव बंगला ,देऊळगाव रामा, उमरखोजा, हिवराबेल, दुर्गसावंगी ,चिंचाळा, बोराळा
सर्वसाधारण पुरुष
आंबाळा, केसापूर ,खेर्डा ,खेड ,गाडीबोरी, जयपूरवाडी, जांभरून आंध ,नरसी नामदेव, पातोंडा, पहेनी, पांगरी, बासंबा ,भिरडा ,भिंगी ,माळहिवरा, राहोली ,वरूड गवळी, सावा, साटंबा ,हिंगणी, जांभरून तांडा ,इंचा ,सवड, दुर्ग धामणी, अमला, भोगाव ,भटसावंगी
सर्वसाधारण महिला
इसापूर, कानडखेडा खु, कानडखेडा बु, करंजाळा, खंडाळा, खरबी, दिग्रस कराळे, चिंचोली, नवलगव्हाण, नांदुरा, पळसोना ,पिंपरखेडा, पारोळा, बोडखी, बोरजा, बोरी शिकारी, बोंडाळा ,लासीना, वडद ,वराडी, वांजोळा, सावरखेडा, हिरडी ,येळी, पारडा ,कारवाडी ,सागद, बेलुरा
अशा 111 ग्रामपंचायतच्या सरपंचाचे आरक्षण झाले यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे तहसिलदार पाडुरंग माचेवाड नायब तहसीलदार खंडागळे नायब तहसीलदार वडोळकर आदींची उपस्थिती होती यावेळी पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता
إرسال تعليق