थरारक.... पोलीस ठाण्यातच खुपसला स्वतःच्या पोटात चाकू...

हिंगोली, दि. ९ नोव्हेंबर:- प्रेम प्रकरणातून एका तरुणाने पोटात चाकू मारून घेतला.(A young man stabbed himself in the stomach in a love affair) ही घटना हिंगोली येथिल ग्रामीण पोलीस ठाण्यात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला हिंगोलीत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की सदर तरुणाचे तेथील एका महिलेशी प्रेम संबंध होते. या प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या वादात, त्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याने पोलीस ठाणे गाठून स्वत:च्या पोटात चाकू खुपसला. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून रूग्णालयात हलविले. ही घटना हिंगोली पोलीस ठाण्यातच घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे 

तरुणाचे नाव आणि इतर माहिती मिळू शकली नाही. परंतु तरुण आणि महिला दोघेही हिंगोली जिल्हा बाहेरील असल्याची माहिती आहे. याबाबत अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल...

Post a Comment

أحدث أقدم