महिला पोलिसावर बलत्कार, आरोपीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल..

हिंगोली, दि. २४:- येथील पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचार्‍याला लग्नाचे अमिष दाखवून सहा वर्षांपासून बलत्कार केल्याचा प्रकार उघड झाला असून याबाबत आरोपी केशव दत्ता धाडवे (३०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर फिर्यादी २९ वर्षीय महिला पोलिस कर्मचारी हिंगोलीत कार्यरत असताना आरोपी केशव दत्ता धाडवे (३०) रा. लिंबी लोहरा, ता. हिंगोली याने तिच्याशी जवळीक केली. त्यानंतर प्रेम प्रकरणात ओढले. फिर्यादीला लग्नाचे अमिष दाखवून १ एप्रिल २०१४ ते ३ सप्टेंबर २०२० या दरम्यानच्या काळात सरस्वती नगर आणि नविन पोलिस वसाहत, हिंगोली येथे तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. फिर्यादी महिलेने आरोपीकडे लग्नाची मागणी केली अ‍सता, तू आदीवासी आहेस, आमच्यापेक्षा हलक्या जातीची आहेस त्यामुळे तुझ्याशी लग्न करणार नाही असे म्हणून आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे पिडीतेने येथील शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आयपीसी आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमूख हे करीत आहेत

Post a Comment

أحدث أقدم