खासदार हेमंत पाटील यांनीभज्यांचा स्वाद घेतं दिवाळी केली साजरी

*खासदारांनी मारला मुंगाच्या भज्यांवर ताव;  भजाचा आस्वाद घेत केली दिवाळी साजरी* 
हिंगोली-  हिंगोलीच आवडत खाद्य म्हणजे खिचडी अन भजे, शहरात आल्यानंतर मुंगाच्या भजाचा दरवळणारा सुगधं सर्वांनाच मोहात पडणारा आहे. तसेच हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांना ही सुगधं आल्यानंतर भजे खाण्याचा मोह अजिबात आवरला नाही. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता ताबडतोब हॉटेल मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह धाव घेऊन, मुंगाच्या भजावर ताव मारला. अन भजाचा  स्वाद चाखून मालक आणि कारागिरांची प्रशंसा केली.

सध्या दिवाळी सणाची फार झुंबड सुरू आहे, खरेदी ची रेलचेल असल्याने, बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र बाजारात येणाऱ्या ची पावले खिचडी भज्याच्या अलीकडे आपसूकच वळत आहेत अशा आजही हॉटेलमध्ये ग्राहकांची वर्दळ सुरू असताना अचानक खासदार हेमंत पाटील हे येथून जात होते तर त्यांना त्याचा खमंग सुगंध आला त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवून हॉटेलमध्ये प्रवेश केला. खासदारांना हॉटेल मध्यें पाहून सर्वच अचंबित झाले. तर हॉटेल मालक शंकर साहू यांनी खासदार यांच्याकडे धाव घेतली.


*हॉटेल मालक गेला गोंधळून*

 मालक साहू यांना काय करू काय नाही काही ही सूचत नव्हते, मात्र कोणताही बडेजाव न करता गरमा गरम मुगाच्या भजाची ऑडर देऊन, सर्वांसोबत बसून, खिचडी अन भाज्यांचा आस्वाद घेतला. खासदार पाटील यांचा हा साधेपणा सर्वांनाच आनंद आणि सुखद धक्का देणारा होता. 

*अशीच चव कायम राहण्यासाठी दिल्या शुभेच्छा*


यावेळी खासदार पाटील म्हणाले की, तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्या तुमच्या हॉटेल मधील खिचडी अन भजाची चव ही उत्कृष्ट आहे. व्यवसाय वाढलेला असला तरी स्वाद मात्र तोच आहे अन पुढेही कायम रहावा अशा शुभेच्छा दिल्या. हा साधेपणा पाहून ग्राहक ग्राहक ही आनंदीत झाले. 

*शहरातील व्यापाऱ्यांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा*


  हिंगोली शहरातील सर्वच व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्याना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीप बांगर, लखन कुरील, निलेश साहू, सूरज पुरोहीत, विक्रम कुरील आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم