हिंगोलीत कार्यक्रम ,कामगार संघटनेचा पुढाकार (Distribution of Diwali Faral to 100 women)
हिंगोली - दिपावली निमित्य महिला मोलकरीण कामगारांना दिपावलीची भेट म्हणून रविवारी एका कार्यक्रमात रोजगार मोलकरीण कामगार संघटनेच्या पुढाकारातून १०० महिलांना फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
दीपावली म्हटले की ,सर्वांना आनंद होतो. उच्य वर्णीय व मध्यम वर्गीय कुटुंबात दिपावली हर्ष उल्हासात साजरी केली जाते, पंच पक्वान्न, शिवाय विविध फराळाचे साहित्य वर ताव मारल्या जाते. मात्र गोरगरीब मोलकरीण कुटूंबियात दिपावली साजरी करण्यासाठी काम केले तरच जवळ पैसे येतील अन दिवाळी साजरी करता येईल, परंतू हाताला कामच नसल्याने दिवाळी कसी साजरी करणार असा प्रश्न पडला असताना यावेळी देवदूत म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार सुधाकर वाढवे यांच्या पुढाकारातून मोलकरीण, कामगार महिलांना देखील दिपावली साजरी करता यावी यासाठी दहा हजार रुपये खर्च करून जवळपास १०० कामगार महिलांना दिवाळी निमित्य फराळ, मिठाई ,आदी गोड पदार्थ वाटप करण्यात आले.
या कर्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ,जेष्ठ पत्रकार कल्याण देशमुख यांची उपस्थिती होती .यावेळी पत्रकार विलास जोशी, रवी पाटील शिखरे, संघटनेचे सल्लागार धोंडिराज पाठक, शिक्षिकांत रामेश्वरे ,सामाजिक कार्यकर्ते पिंटू टाले, मख्खन शर्मा, प्रणव जोशी आदींची उपस्थिती होती. यावेळी मोलकरीण महिला राधा खंदारे ,वंदना मोरे, द्वारकाबाई मनवर ,किरण धवसे, मनीषा भालेराव, सुमन शितले, कल्पना इंगोले, चंद्रभागा धुळे, सुजाता खंदारे, वैशाली खंदारे, रूपाली खंदारे आदी कामगार महिलांना दिवाळी निमित्य फराळ, मिठाई खाद्य पदार्थाचे वाटप करण्यात आले.त्यामुळे सर्व महिला कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू वाहत होते.
पत्रकार सुधाकर वाढवे यांनी कोरोना संकट काळात ऐनलॉक डाऊन असताना देखील १०० पेक्षा अधिक महिलांना धान्याचे किट वाटप केले. त्यानंतर कामगार महिलांचा प्रश्न समजून घेत त्यांना कामगार कार्यालया कडून नाव नोंदणी करून त्यांना आर्थिक मदत मिळवून दिल्याने शेकडो कामगार महिलाची दिवाळी आनंदी साजरी करण्यात सिंहाचा वाटा उचलला असल्याने कामगार महिला वर्गात एन दिवाळी सणात आनंद होत आहे. सूत्रसंचालन विलास जोशी यांनी केले तर ,आभार रवी शिखरे यांनी मानले.
إرسال تعليق