हजारो भाविकांच्या उपस्थितीत पणत्या पेटवून जन्म सोहळा साजरा
नर्सी नामदेव - / भरारी वृत्त/-
हिंगोली तालुक्यातील श्री क्षेत्र नर्सी नामदेव या ठिकाणी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव गुरुवारी (ता.२६) हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.
श्री संत नामदेव महाराज यांचा ७५० व्या जयंती सोहळ्या निमित्त संत नामदेव मंदिर संस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत नामदेव जन्म सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरे करण्यात आले.
सकाळी ६:०० वाजता नर्सी सह पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीमध्ये मंदिर परिसरामध्ये लाखो पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला .यानंतर हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड सपत्नीक व सुधीर आप्पा सराफ यांच्या हस्ते श्रीच्या वस्त्र समाधीची महापूजा करण्यात आली.
यावेळी महापूजेस आ. तानाजी मुटकुळे, संजय बोंढारे, विनायक देशमुख, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, सुभाष हुले, रामराव सोळंके, भारत महाराज, प्रकाश थोरात, डॉ.रमेश शिंदे, माधवराव पवार, अँड के.के शिंदे, नारायण खेडकर,दाजीबा पाटील, शामराव जगताप,काशीराम महाराज, लोकेश चैतन्य स्वामी, विठ्ठल चौतमल,
दिलीप देसाई,अनिल नैनवानी,
डॉ. रोडगे, भागवत सोळंके, शिवशंकर वाबळे, ओम देशमुख, विलास कानडे, आदी उपस्थित होते.
संत नामदेवाचा ७५० वा जन्म सोहळा साजरा करण्यासाठी भल्या पहाटे पासूनच भाविकांनी तोंडाला मास्क लावून मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती. मंदिर परिसरामध्ये फुलांनी रांगोळ्या पणत्या लावून व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.
यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की आपण राष्ट्रीय संत श्री नामदेव महाराज यांची जयंती आपण उत्साहात साजरी करताना अतिशय समाधान होत असून हा ७५० जन्म सोहळा असल्याने हा सोहळा भव्य आणि मोठ्या उत्साहाने लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करायचा होता. परंतु सध्या कोरोनाच्या उद्भवलेल्या संकटामुळे तसे करता येत नाही, परंतु संत नामदेव महाराज यांचा ७५१ वा जन्म सोहळा हा मोठा उत्साहाने सर्वानी मिळून हँलिकँपटरमधून संत नामदेव महाराज यांच्या मंदिरावर पुष्पवृष्टी करून साजरा होणार असल्याचे सांगितले. तानाजी मुटकुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नर्सी ठाण्याचे पोउपनि अशोक कांबळे यांनी मंदिर परिसरामध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
إرسال تعليق