पाच हजाराची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर एसीबीने केला गुन्हा दाखल
बीभीशन जोशीले /सुधाकर म्हलोत्रा
--------------------------------------------
हिंगोली - हात्माली शेत शिवारातील गट १४६, ११८ मधील शेताचे ऑन लाईन फेरफार मध्ये दुरुस्ती करण्यासाठी व तहसील कार्यालयातून ओळखीने मंजुरी करून देतो म्हणून तलाठ्याने पाच हजाराची लाचेची मागणी तक्रादाराकडे केली होती. मात्र तलाठ्याने पाच हजाराची लाच स्वीकारली नसल्याने त्याच्यावर कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील तलाठी बेले यांनी तक्रार दाराच्या शेताचे ऑनलाईन फेरफार मध्ये दुरुस्ती करून देतो म्हणून पाच हजाराच्या लाचेची मागणी तक्रादाराकडे केली होती.तसेच तहसील कार्यालयातील ऑनलाईनची कामे करणारे कोतवाल हमीद यांच्याकडे रकम देण्याचे सांगितले होते.त्यानुसार तक्रारदाराने १६ डिसेंबर रोजी तलाठी बेले यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत कार्यालयात केली. त्यानुसार प्रभारी पोलीस उपधीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने या घटनेची पडताळणी केली असता यातकोतवाल हमीद याने पाच हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे स्पस्ट झाले.
त्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पथकाने ता.१७ ते २१ डिसेंबर या कालावधीत सापळा रचला होता. मात्र तलाठी बेले व कोतवाल हमीद यांना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही.त्यामुळे या दोघाविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांना हि ताब्यात घेतले आहे.पुढील कारवाई सुरू असल्याचे नितीन देशमुख यांनी सांगितले.
إرسال تعليق