पोदार इंटरनॅशनल मध्ये दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा
हिंगोली - येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल मध्ये दोन दिवसीय पोदार परेन्ट्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले होते. मात्र यातील चार संघ बाद झाल्याने उर्वरित चार संघात सेमी फायनल व अंतिम सामना खेळविण्यात आला.अंतिम सामन्यात वीर वॉरियार संघाने शायनिंग संघावर दणदणीत विजय मिळवीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
येथील पोदार स्कुलच्या वतीने फिट इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्या प्रमाणे पालकांचा देखील सर्वांगीण विकास व्हावा हा दूर दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांनी दोन दिवसीय परेन्ट्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. पोदार स्कुलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत पालकांच्या संघांनी सहभागी होऊन प्रतिसाद दिला.
येथील मैदानावर रविवारी शायनिंग स्टार्स विरुद्ध कॅलिबर किंग या दोन संघात सेमी फायनल सामना खेळविण्यात आला होता. यामध्ये शायनिंग संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना दहा षटकांचा होता. कॅलिबर संघाने फलनदाजी करीत दहा षटकात चार विकेट गमावत ९८ धावा केल्या होत्या.यामध्ये सर्वाधिक धावा बांगर यांनी काढल्या. त्यानंतर शायनिंग संघाला ९९ धवांचे लक्ष देण्यात आले होते. मैदानावर फलनदाजी करण्यासाठी डाके व आनंद यांनी आपल्या विकेट गमावल्यानंतर शायनिंग संघाला दोन मोठे धक्के बसले, त्यानंतर आलेल्या उमेश कुटे यांनी तुफान फटकेबाजी करीत शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारीत आपल्या संघाला शानदार विजय मिळवीत अंतिम सामन्यात मजल मारली.
त्यानंतर अंतिम सामना वीर वॉरिअर विरुद्ध शायनिंग यांच्यात सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघाला मैदानात पाचारण करण्यात आले, यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी संघाचा परिचय करून घेतला.त्यानंतर टॉस करण्यात आली यावेळी शायनिंग स्टार संघाने टॉस जिंकत गोलनदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. प्रथम फलनदाजी करीत वीर वॉरियार संघाने १२ षटकात चार विकेट गमावत ११९ धावा फाटकावल्या मुळे शायनिंग संघाला १२० धावांचे टार्गेट दिले.
विर वॉरियर संघाने दिलेल्या ११९ धावांचे लक्ष समोर ठेवत मैदानात उतरलेल्या श्यायनिंग संघाने बारा षटकात नऊ गडी गमावत केवळ ९९ धावा फटकावल्या त्यामुळे शायनिंग संघाला २२ रनाने पराभव पत्करावा लागला. वीर वॉरियर कडून मनीष बगडीया यांनी नाबाद राहत पहिल्या विकेट साठी चाळीस धावांची भागीदारी करीत ३७ धावा काढल्या,स्वप्नील मास्ट याने ३३ धावा काढल्या. शायनिंग संघाकडून सुनील वाघ यांनी दोन विकेट घेतले, श्याम नेनवानी यांनी भेदक मारा करीत फलनदाजांना जखडून ठेवले. शायनिंग संघाने टॉस जिंकत गोलनदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला.वीर वॉरियार संघाने प्रथम फलनदाजी करीत बारा षटकात चार विकेट गमावून११९ धावा केल्या.१२०धावांचे माफक आव्हान घेऊन उतरलेल्या शायनिंग संघाला हे आव्हान झेपावले नाही त्यांचे गडी विशिष्ट अंतरावर बाद होत असताना धाव संख्येचा पाठलाग करता आला नाही. अखेर वीर वॉरियार संघाने शायनिंग संघावर मात करीत सहज विजय मिळवीत चषक पटकाविला.
إرسال تعليق