आरोग्यमंत्री राजेश टोपे, वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शिवलीला पॅलेसचे उदघाटन
हिंगोली,- शहरामध्ये आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे , वन पुनवर्सन मंत्री संजय राठोड हे शुक्रवारी हिंगोलीत येणार असून त्याच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.
नविन वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी राजेश टोपे , संजय राठोड यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .यानिमित्त हिंगोली शहरातील शिवलीला पॅलेसचा उदघाटन समारंभ दुपारी १२.३० वाजता दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडणार आहे. तसेच नारायण नगर भागातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलचा शुभारंभ सकाळी ११.४५ वाजता होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीतील खासदार हेमंत पाटील, खासदार राजीव सातव, आमदार संतोष बांगर, तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदींची उपस्थिती राहणार आहे.
إرسال تعليق