हिंगोलीत लक्ष्मी लाईफ *केअर*
*हॉस्पीटलचे*1 *जानेवारीला लोकार्पण*
*आरोग्य मंत्री राजेश टोपे, ना. संजय*
हिंगोली/ प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा बोध घेवून हिंगोली शहरात अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या प्रशस्त लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलचे 1 जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, भुकंप व पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
हिंगोली परिसरातील आरोग्य विषयी वाढत्या गरजांचा विचार करुन अद्यावत सुविधांनी परिपूर्ण अशा लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, भुकंप व पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर विशेष उपस्थिती म्हणून खा. राजीव सातव, खा. भावनाताई गवळी, खा. हेमंत पाटील, आ. तान्हाजीराव मुटकुळे, आ. संतोष बांगर, आ. राजुभैय्या नवघरे, आ. गोपिकिशन बाजोरिया, आ. विप्लय बाजोरिया, आ. कैलाससेठ गोरंट्याल, आ. राजेंद्र पाटणी, आ. डॉ. वजाहतजी मिर्झा, आ. लखनजी मलीक, आ. अमित झनक, माजी मंत्री तथा साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी खा. शिवाजीराव माने, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. रामराव वडकुते, माजी आ. गजाननराव घुगे, माजी आ. डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जालनाच्या नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल, जि.प. उपाध्यक्ष मनिष आखरे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, विश्वनाथ कोल्हाळ आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. लक्ष्मी लाईफ केअर रुग्णालयाच्या माध्यमातून फिजीशियन, ह्दयरोग, मधुमेह तज्ञ डॉ. अखिल अग्रवाल, जनरल सर्जन डॉ. गणेश शिंदे, अस्थिरोग तज्ञ डॉ. शशांक एकडे पाटील, भुलतज्ञ डॉ. प्राची अखिल अग्रवाल, कन्सलटींग रेडिओलॉजिस्ट डॉ. मयुर अ. अग्रवाल, आहार व लसीकरण तज्ञ डॉ. टी.एम. आऊलवार, किडनी विकार तज्ञ डॉ. पंकज गोटे पाटील, प्लास्टीक सर्जन डॉ. मयुर बी. अग्रवाल, लप्रोस्कोपी सर्जन डॉ. जळबाजी मोरे, सांधे प्रत्यारोपण तज्ञ डॉ. कपील सावजी ही डॉक्टर मंडळी रुग्णांना सेवा देणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती हनुमानदास अग्रवाल वरुडकर, जगदीश बाईसीया अग्रवाल, महादू शिंदे, अॅड. जानकीराम हेकडे पाटील, भगवानराव गोटे, अभियंता अशोक अग्रवाल, सौ. रुपा अग्रवाल यांनी केले आहे.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा- डॉ. अखिल अग्रवाल
हिंगोली जिल्ह्यातून आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या नात्याने आम्ही हे रुग्णालय सुरु करत आहोत. सुसज्य मल्टिस्पेशालिस्ट 50 बेडचे हॉस्पीटल असून दहा बेडचे अद्यावत अतिदक्षता विभाग, 2 बेडचे वातानुकूलित आयसोलेशन अतिदक्षता विभाग तसेच हॉस्पीटलमध्ये ह्दयरोग, मधुमेह, थॉयराईड, विषबाधा, सर्पदंश, मेंदूरोग, पॅरालिसेस, फिटस, फुफूस, किडनी, लिव्हर, पोस्ट कोव्हिड, चिकीत्सा आदी आजारावर उपचार होणार आहेत. तसेच मोडलेल्या हाडांचे उपचार व शस्त्रक्रिया, सांधेदुखी, गुडघे, गुडघ्यांचे आजार व उपचार व शस्त्रक्रिया, सुसज्य अपघात विभाग, प्लास्टीक सर्जरी, न्युरो सर्जरी, अपेंडीक्स, हारणीया, हायड्रोसिल, किडणी, स्टोन व पित्याशयाचे खडे, मुळव्याध, भंगदर व फिशरचे उपचार अत्याधुनिक दुर्बिनद्वारे बिनटाक्याची सर्जरी अशा अनेक आजारावर उपचार होणार असल्याची माहिती डॉ. अखिल अग्रवाल यांनी दिली आहे.
إرسال تعليق