तब्बल बारा वर्षांनंतर हिंगोली आगाराला आली जाग
संकुला समोरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले
हिंगोली प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या येथील आगाराच्या नांदेड महामार्ग व औंढा नागनाथ रोड कडून असलेल्या व्यापारी संकुला समोरील अतिक्रमण तब्बल बारा ते तेरा वर्षानंतर सोमवारी( ता.२८) पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. काढलेल्या अतिक्रमणाने व्यापाऱ्यातून ही कारवाई आत्ताच का केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आगाराने अंदाजे सन दोन हजार आठ ,नऊ मध्ये नांदेड ,औंढा नागनाथ रस्त्या वरील आगारातील जागेच्या परिसरात आगाराला आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी व्यापारी संकुल उभारले होते. सध्या हे व्यापारी संकुल अनेकांनी भाडे तत्वावर चालविण्यास घेतलेले आहे. यातील काही व्यापाऱ्यांनी व शहरातील काही नागरिकांनी मोकळ्या जागेत आपली दुकाने थाटली होती. यात हॉटेल चालकांचाही समावेश आहे.
राज्य परिवहन मंडळाने अतिक्रमण काढण्याच्या सूचना आगाराला दिल्या होत्या. त्यानुसार आगराने मागील आठवडा पूर्वी संकुलातील ३६ गाळे धारकांना एक वेळा नोटीस बजावली होती.त्यानंतर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण हटविले नसल्यामुळे सोमवारी पोलीस बंदोबस्तात हॉटेल समोरील अतिक्रमण हटविल्याने संकुलातील व्यापाऱ्यांत कही खूसी, कही गम असे दिसून येत होते.
काढण्यात आलेल्या अतिक्रमणाने येथून ये-जा करणाऱ्या प्रवासी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याठिकाणी वाहनधारक अस्तव्यस्त पणे आपली वाहने लावीत होते. तसेच या ठिकाणाहून नांदेड, औंढा नागनाथ, सेनगाव अशी प्रवासी वाहतूक देखील केली जात होती. त्यामुळे येथील आगाराला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. याबाबत अनेकदा विविध प्रसारमाध्यमांतून आवाज उठविण्यात आला होता. परंतु त्याकडे आगाराने वेळोवेळी दुर्लक्ष केले होते.
मात्र सोमवारी २८ रोजी आगाराने महामंडळाच्या आदेशाने येथील सर्व अतिक्रमण पोलिसांची मदत घेऊन हटविले आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अतिक्रमण हटविणे सुरू होते. तब्बल दहा ते बारा वर्षानंतर महामंडळाकडून करण्यात आलेल्या कारवाईने प्रवासी नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे तर ही कारवाई आत्ताच का असा प्रश्न येथील अनेक व्यापारी हॉटेल चालक यांच्यातून उपस्थित केला जात आहे.
---------------------
व्यापारी संकुल उभारणार
-----------------------
येथील आगाराच्या नांदेड नाका बाजूने असलेल्या व्यापारी संकुला समोर मोकळ्या जागेतील अतिक्रमण मोहीम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली, यापुढे संकुलाच्या समोर अतिक्रमण होऊ नये यासाठी आगामी काळात व्यापारी संकुल उभारणार असल्याचे आगाराचे जूनियर इंजीनियर श्री. त्र्यंबके यांनी सांगितले.
إرسال تعليق