हिंगोली जिल्ह्यातील तांड्यात सापडला शस्त्रसाठा जिल्ह्यात खळबळ

हिंगोली जिल्ह्यात पिस्टल बंदूक शस्त्रसाठा जप्त
स्थानिक गुन्हे  शाखेची कारवाई

हिंगोली  प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बोडखा तांडा शिवारात गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने शेतात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आज शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून दोघे गंभीर गुन्हा करण्याची शक्यता वर्तविली जात होती

सेनगाव तालुक्यातील व औंढा पोलीस स्थानक अंतर्गत येणाऱ्या बोडखा तांडा गावच्या शिवारात काही जणांनी शस्त्रसाठा लपविल्याची माहिती स्था.गु..शा.चे  वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांना माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास पोलीस अधीक्षक राकेश कालासगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गावात रहात असलेल्या धनसिंग उर्फ भाऊ राठोड व नवनाथ राठोड रा. बोडखा तांडा यांच्या घरावर छापा टाकला असता त्यांच्या घरात लपविण्यात आलेले एक पिस्टल, एक बंदूक, तीन जिवंत काडतूस, गनं पावडर, छर्रे व खंजीर असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कच्छवे यांनी दिली. या कारवाईत पो.उप.नी शिवसांब घेवारे, पोउपनी बाबासाहेब खर्डे, पोलीस कर्मचारी शंकर जाधव, विलास सोनवणे, डुकरे अर्जुन पडघम, रुपेश धाबे, महेश बंडे, शेख शफी, आकाश तापरे यानी सहभाग  घेतला होता
अचानक का शस्त्रांसह साठा सापडल्यामुळे पोलिसात मोठी खळबळ उडाली होती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने