इरफान पटेल यांच्याकडून अनेक नागरिकांची फसवणूक पोलिसांचा शोध सुरू....हिंगोली प्रतिनिधीहिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात इरफान नजीर पटेल राहणार औरंगाबाद हल्ली मुक्काम रिसाला बाजार हिंगोली यांनी हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच बेरोजगार तरुणांना व नागरिकांना जिल्हा उद्योग केंद्रातून व जिल्हाधिकारी कार्यालयातून विविध उद्योगासाठी एक लाख रुपये वीस लाख रुपये पर्यंत लोन मंजूर करून देतो माझी जिल्ह्यात बऱ्याच प्रशासकीय अधिकार्‍यांशी ओळख आहे असे म्हणून विश्वासात घेऊनलाभार्थ्यांकडून वीस हजार पन्नास हजार एक लाख असे रखमा घेऊन फरार झाला आहे...फसवणूक झालेल्या पैकी दोन बेरोजगार तरुणांनी इरफान नजीर पटेल यांनी केलेल्या फसवणुकीबद्दल रीतसर पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे तक्रार दिली आहे.सदर तक्रारीच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यांमध्ये इतर बऱ्याच बेरोजगार तरुणांची व नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झालेले असण्याची शक्यता आहे म्हणून हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की जे जे बेरोजगार तरुण व नागरिक इरफान नजीर पटेल याच्या आमिषाला बळी पडून आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून रीतसर तक्रार द्यावी असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे....

Post a Comment

أحدث أقدم