जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातुन हिंगोली जिल्ह्य़ातील सर्व अंगणवाडी केंद्रांची एकसमान रंगरंगोटी व अंगणवाडी बोलक्या करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आजपर्यंत 221 अंगणवाडी केंद्राना रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली तालुका 58 व सेनगाव 53 अंगणवाडी केंद्राना रंगरंगोटी करुन आघाडी घेतली आहे.
या सर्व अंगणवाडी केंद्रांना रंगरंगोटी करण्यासाठी श्री.राधाबिनोद शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुप शेंगुलवार अति मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री. माळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्र श्री. डाॅ. पोहरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत व श्री गणेश वाघ उप मुख्य कार्यकारी अधिकारी बा. क यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गटविकास अधिकारी, सर्व बाविप्रअ, सर्व पर्यवेक्षिका व ग्रामसेवक यांनी परिश्रम घेतले.
येत्या आठवडय़ात पुर्ण अंगणवाडी केंद्राना एकसमान रंगरंगोटी करण्याचा मानस आहे. एकसमान रंगरंगोटी झाल्यानंतर महाराष्ट्रात हिंगोली हा असा नाविन्यपूर्ण विक्रम करणारा पहिला जिल्हा असणार आहे. या रंगरंगोटीमुळे महिला बालकल्याण विभात, सेविका मदतनीस, अंगणवाडीची बालके व पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
إرسال تعليق