*सरपंच पदाचे आरक्षण सोडत 28 व 29 जानेवारीला*
हिंगोली, महाराष्ट्र 24 न्यूज
दि. 22 : जिल्ह्यातील सेनगाव, वसमत आणि कळमनुरी या तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम गुरुवार, 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी 12.00 वाजता तर हिंगोली आणि औंढा नागनाथ या तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम शुक्रवार 29 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 12.00 वाजता सर्व संबंधित तालुका मुख्यालयी होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.
****
إرسال تعليق