पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले अधिकाऱ्यांचे कौतुक
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव -
येथील पोलिस ठाण्याला बुधवारी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी भेट देऊन पाहणी केली असता गंभीर गुन्हे निकाली काढण्यात आल्या मुळे तसेच स्वछते बद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
तालुका ठिकाणच्या सेनगाव पोलिस ठाण्याला पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उप अधीक्षक ग्रामीण विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, यांची उपस्थिती होती.
यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती दीक्षाताई लोकडे, पोलिस उपनिरीक्षक बाबुराव जाधव, अभय कुमार माकणे, यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी गंभीर गुन्हे निकाली काढल्यामुळे सेनगाव पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले. शिवाय ठाण्यातील स्वछते बदल समाधान व्यक्त केले.पोलिस कर्मचारी पदमाकर खंदारे, रमेश कोरडे,श्रीराम पुरी,संजोग वाघमारे, अनिल भारती, संदीप सोनटक्के, यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले
إرسال تعليق