हिंगोली जिल्ह्यात दोन ठिकाणी covid-19 च्या लसीकरनाला सुरुवात
हिंगोली प्रतिनिधी : गेल्या 10 महिन्यापासून चर्चेत असलेली कोविड लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात दोन केंद्रावर सुरूवात झाली आहे. आज शनिवारी जिल्हा सामान्य रूग्णालय हिंगोली येथे 100 आरोग्य कर्मचार्यांना तर कळमनुरीत उपजिल्हा रूग्णालयात 100 आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत कोरोनाची प्रतिबंधात्मक पहिली लस वैद्यकिय अधिकारी डॉ. दिपक मोरे यांना देण्यात आली.
13 जानेवारी रोजी हिंगोली जिल्हासाठी पहिल्या टप्यात कोरोना लसीचे 6 हजार 650 डोस प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी 16 जानेवारी प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. येथील शासकीय परिचारीका महाविद्यालयात सुरू झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, जिल्हाशल्यचिकित्सक रोजेंद्र सुर्यवंशी जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. दिपक मोरे, तालुका आरोग्य अधिकारी नामदेव कोरडे, डॉ. मंगेश टेहरे आदींची उपस्थिती होती. कोविन अॅपद्वारे नोंदणी केलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सेवक, परिचारीका यांना प्रत्यक्ष लस देण्यात येत आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात 100 व कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयातून 100 कर्मचार्यांना ही लस देण्यात येत आहे. तांत्रीक बाबी पुर्ण केल्यानंतर डॉ. दिपक मोरे यांना आज पहिली कोरोना लस दिली गेली. लस दिलेल्या कर्मचार्यांना अर्धातास डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवले जात आहे. या काळात त्यांच्या प्राथमिक तपासण्याही डॉक्टरांच्या माध्यमातून केल्या जात आहेत. त्यानंतर लाभार्थ्यांना कोविन अॅपद्वारे आपले लसीकरण यशस्वीरित्या पुर्ण झाल्याचा संदेश मोबाईलवर मिळणार आहे. गेल्या कितेक महिन्यापासून कोरोना लसीची सुरू असणारी प्रतिक्षा आता प्रत्यक्ष लसीकरणामुळे संपली आहे.
आरोग्य विभागाची कामगीरी सुवर्ण अक्षरात लिहीली जाईल – जिल्हाधिकारी रूचेश जयवंशीगेल्या दहा महिन्यापासून कोरोना साथ रोगाला हरविण्यासाठी सर्व विभागाने परिश्रम घेतले आहेत. यामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांचा मोठा वाटा आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांने कोरानाशी लढा देतांना जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा दिली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची कामगीरी सुवर्ण अक्षरात लिहीली जाईल असे गौरव उद्गार जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी यावेळी बोलतांना काढले.
إرسال تعليق