हिंगोलीत महिला पोलिस बेवारस बाळाचे करते संगोपन

*बेवारस स्थितीत सापडलेल्या बाळाला हिंगोली पोलीस दलाची मायेची उब*                                  दिनांक 16/ 1/ 2020 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बसस्थानक हिंगोली येथे बेवारस सोडलेल्या 3 महिने वयाच्या पुरुष जातीच्या बाळाला हिंगोली पोलीस दलातील  महिला पोलीस अंमलदार सलमा शेख यांनी दिली मायेची उब. सदरचे बाळ हे शासकीय हॉस्पिटल हिंगोली येथे उपचार घेत असून महिला पोलीस अंमलदार सलमा शेख या त्यावर देखरेख करण्यासाठी नेमणुकीस आहेत. सदर बाळाची योग्य देखरेख करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर साहेबांनी सूचना दिलेली आहे व काळजी घेण्याबाबत सांगितले आहे. पोलिसांमध्ये परिस्थितीनुसार कठोरते सोबत मायेचा जीवाळा सुद्धा असतो हे सदर छायाचित्रावरुन निदर्शनास येते. जगामध्ये कोणत्याही धर्मापेक्षा माणुसकीचा धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे हे  हे यावरून सिद्ध होते. सदर बाळांच्या पालकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी मदत करण्याचे हिंगोली पोलीस दलातर्फे आव्हान करण्यात आले आहे. सदर बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली पोनि श्री उदय खंडेराय पोउपनि श्री एस एस घेवारे, नितीन केणेकर , पोलीस अंमलदार जाधव यांचे पथक काम करत आहे. सदर बाळाच्या मातापित्यांची माहिती असल्यास या 8669900678 , 7350507200 नंबर वर संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे .संपर्क साधणाऱ्या चे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

Post a Comment

أحدث أقدم