रेती तस्कर व गाव गुंडांचे अवसान गळाले पोलीस उपाधीक्षक देशमुख यांची कारवाई

पोलीस उपाधीक्षक देशमुख यांच्या कारवाईमुळे हिंगोली जिल्ह्यातील गावगुंड व रेती तस्करांचे
अवसान गळाले

स.पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी  हिंगोलीतील अवैध रेतीसाठा  केला जप्‍त*  दिनांक 17 /1/ 2020 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री सतीश देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तलाब कट्टा परिसरातील अंदाजे आठ ते दहा ब्रास किमती पस्तीस ते चाळीस हजार रुपयाचा अवैधपणे साठवून ठेवलेला रेती साठा जप्त केला असून सदर कार्यवाहीमुळे वाळू तस्करामध्ये खळबळ उडाली आहे. सदरचा रेती साठा तलाठी  प्रदीप इंगोले यांनी ताब्यात घेतला असून सदरचा रेती साठा कुणी आणला याबाबत पोलिसांतर्फे तपास करून अवैधपणे रेती साठा करनारेवर कार्यवाही करण्यात येणार आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सतीश देशमुख,  पोलीस उपनिरीक्षक एस   एस घेवारे, पोलीस अमलदार दिलीप बांगर , ज्ञानदेव घुगे ,शेख जमीर, प्रदीप राठोड , भिसे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

أحدث أقدم