अवैध वाळूची वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडून 23 लाखाचा मुद्देमाल

अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर पकडले; 
आरोपीकडील २३ लाखांचा मुद्देमाल जप्त         रिती तस्करांचे धाबे दणाणले 

           हिंगोली : जिल्ह्यात अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांवर पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. आज १२ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले. आरोपीकडील वाळू तसेच ट्रॅक्टर असा एकूण २३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले आहेत. हिंगोली तालुक्यातील ईडोळी ते साटंबा जाणाऱ्या रस्त्यावरून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करताना उत्तम महादा चक्के तसेच वैजनाथ प्रकाश डोल्हारे, कैलास परसराम करडीले, मंगेश शिवाजी डोल्हारे सर्व राहणार इंचा ता. हिंगोली हे अवैधरित्या गौण खनिजाची विनापरवाना चोरटी विक्री करण्यासाठी वाळू वाहनाद्वारे घेऊन जाताना पोलिसांना आढळून आले. यावेळी पोलिसांनी आरोपीकडील २० हजार रुपये किमतीची ४ ब्रास वाळू, २२ लाख ८० हजार रुपये किमतीचे ट्रॉली असा एकूण २३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी उत्तम महादा चक्के, वैजनाथ प्रकाश डोल्हारे, कैलास परसराम करडीले, मंगेश शिवाजी डोल्हारे, नारायण बाबुराव डोल्हारे, बंडू निवृत्ती कन्हेकर, शिवाजी विठ्ठल डोल्हारे यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, संभाजी लेकुळे, भगवान आडे, राजू ठाकुर, दीपक पाटील, आकाश टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم