*साळवा पाटीजवळ दोन दुचाकीच्या अपघातात दोघे ठार, दोघे गंभीर जखमी*,
प्रतीनीधी महाराष्ट्र 24 न्युज
कळमनुरी ते आखाडा बाळापूर महामार्गावर साळवा पाटीजवळ दोन मोटरसायकलच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी ता. १३ रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी असलेल्या दोघांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.आज उशीरापर्यंत सदर प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील प्रशांत उर्फ सोनू विजय मुधोळ (२४) हा साळवा फाट्या जवळील एका ढाब्यावर काम करतो. रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास ढाब्यावरील काम आटोपून प्रशांत व त्याचा मित्र प्रदिप मारोतराव निर्मले हे त्यांच्या दुचाकीवर आखाडा बाळापूरकडे निघाले होते. तर याच वेळी घोडा (ता.कळमनुरी) येथील जगदीश केशवराव पतंगे (२५) व राजेश दत्तराव पतंगे हे दोघे त्यांच्या दुचाकीवर साळवा येथे जात होते.
साळवा पाटी जवळ दोघांच्या दुचाकीची समोरा समोर धडक झाली. या अपघातात प्रशांत उर्फ सोनू मुधोळ व जगदीश केशवराव पतंगे हे दोघे जागीच ठार झाले. तर दुचाकीवरील प्रदिप निर्मले व राजेश पतंगे हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच साळवा येथील गावकरी तसेच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, जमादार पंढरीनाथ चव्हाण, वाघमारे, सुखदेव जाधव, खिल्लारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथे रुग्णालयात दाखल केले वैद्दकीय अधिकारी डॉ.प्रताप दुर्गे पाटील, घोटेकर व आरोग्य पथकाने जख्मीवर प्राथमिक उपचार केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याचे सपोनि रवि हुंडेकर व पंढरीनाथ चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणी अद्यापही आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले पोलीस पथक नांदेड ला जख्मी चे जवाब घेण्यासाठी गेले आहे आस सांगण्यात आले.
إرسال تعليق