हिंगोली जिल्ह्यात एक मार्चपासून लॉक डाऊन बाजारपेठेत तुफान गर्दी

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील बाजारपेठेत गर्दी

बीबीशन जोशीले / सुधाकर म्हलोत्रा
-------------------------------------------

हिंगोली -  जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत चार दिवसात १०० चा आकडा पार केल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच चिंतेत सापडले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एक ते सात मार्च या कालावधीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याने लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला बाजार पेठेत सर्वत्र नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे चित्र रविवारी बाजारपेठेत दिसून येत होते.
हिंगोली शेजारच्या  वाशिम, नांदेड, अकोला ,अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  हिंगोली येथे काही दिवसांपूर्वी रात्री सात ते सकाळी सात वाजे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तरी देखील दर दिवशी तीस पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात आढळून येत आहे. कोरोना बाधित रुग्णांना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कडक उपाय योजना करणार असल्याचे सूतोवाच दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार 
जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शनिवारी उशिराने एक ते सात मार्च या दरम्यान टाळेबंदीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.

उद्या एक मार्च पासून जिल्ह्यात दिवसभर टाळेबंदी असल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी भाजीपाला, किराणा आदी साहित्य खरेदी साठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. बहुतांश लोकांनी विना मास्क फिरत होते. बाजार पेठेत नागरिकांनी सोशल डिस्टन्स न पाळता किराणा, भाजी खरेदी साठी एकच गर्दी केल्याचे चित्र होते. एरव्ही पालिकेचे व शहर वाहतूक शाखेचे पथक  विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करीत होते ,मात्र आज हे पथक कुठे गेले काहीच कळायला मार्ग नव्हता.कारण सोमवार पासून  बाजारपेठ बंद राहणार असल्याने रविवारी  लोकांनी किराणा व इतर साहित्य खरेदी साठी कुठल्याही नियमांचे पालन न करता एकच गर्दी केल्याचे चित्र बाजारपेठेत पाहवयास मिळाले.

Post a Comment

أحدث أقدم