अंतुलेनगर येथील आठवडी बाजारात तुफान गर्दी
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन
बिभीषण जोशीले / सुधाकर म्हलोत्रा
-------------------------------------------
हिंगोली - शहरालगत असलेल्या अंतुले नगर आठवडी बाजारात नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन न करता चक्क भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते.
अंतुलेनगर आठवडी बाजारात नेहमीच गर्दी असते, कारण या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी रिसाला बाजार, नेहरूनगर, विद्यानागर, जिजामातानगर , सरस्वतीनगर, विवेकानंदनगर, सावरकर नगर, आदर्श कॉलनीसह बळसोंड हद्दीतील अनेक नगरातील अनेक नागरिक, महिला, भाजीपाला खरेदी साठी येत असतात येत असतात ,याठिकाणी भाजीपाला विक्रेते हे रात्री नऊपर्यंत विक्री करीत असतात, ते देखील विना मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करीत नाहीत. रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा गुल झाल्यास या ठिकाणी छेड
छानिच्या घटना होत आहेत. येथे महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक सुद्धा फिरकत नाही. त्यामुळे चोरी व छेड छानिच्या घटनांत वाढ होत आहे.बाजारपेठेत काही ठिकाणी अंधाराचा फायदा घेत महिलांचे दागिने लंपास होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, याकडे मात्र पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्हा प्रशासनाने एक मार्च ते सात मार्च या कालावधीत लॉकडाऊन लागू केल्याने त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भाजीपाला खरेदी साठी विना मास्क व सोशल डिटन्सचे पालन न करता गर्दी केल्याचे चित्र होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन नागरिकांकडून होत असताना याकडे कोणताही अधिकारी फिरकला नाही. आधीच शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना आठवडी बाजाराकडे देखील कोणी लक्ष दिले नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी मात्र रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात किती जण पॉझिटिव्ह येतील हे तपासणी नंतरच स्पस्ट होईल.
إرسال تعليق