*हिंगोली जिल्ह्य़ातील 100 % अंगणवाडीची एकसमान रंगरंगोटी* *सर्व अंगणवाडी एकसमान रंगरंगोटी करणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा*
हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 962 अंगणवाडी इमारतीपैकी 962 म्हणजे 100 % अंगणवाडी इमारतीची एकसमान रंगरंगोटी पुर्ण होऊन हिंगोली जिल्हा अंगणवाडीची एकसमान रंगरंगोटी करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरलेला आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सर्व अंगणवाडी केंद्राना एकजिनसीपणा व सारखेपणा येण्यासाठी एकसमान रंगरंगोटीचा उपक्रम हाती घेतला. यामध्ये श्री. अनुप शेंगुलवार अति मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धनवंतकुमार माळी, डॉ. पोहरे, श्री गणेश वाघ उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिड महिना एवढ्या कमी कालावधीत जिल्ह्यातील 962 ईमारतीपैकी 962 अंगणवाडीची एकसमान रंगरंगोटी व बोलक्या अंगणवाडीचे काम पूर्ण झाले. अशाप्रकारे एकसमान रंगरंगोटी करणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा होण्याचा बहुमान पटकावला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश वाघ यांनी विशेष पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी रंगरंगोटी बाबत एक डिझाईनची निवड करुन जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची एकसमान रंगरंगोटी व बोलक्या करण्यासाठी मागील दिड महिन्यापासून युद्धपातळीवर नियोजन व अंमलबजावणी केली. याकामी जिल्ह्य़ातील सर्व गटविकास अधिकारी, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी,जिल्हा कक्षातील अधिकारी कर्मचारी, सर्व पर्यवेक्षिका, सर्व ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी परिश्रम घेतले, यामुळे जिल्ह्य़ातील सर्व अंगणवाडी केंद्राची एकसमान रंगरंगोटी व बोलक्या होऊन हिंगोली जिल्हा महाराष्ट्रातील असे करणारा एकमेव जिल्हा ठरलेला आहे.
إرسال تعليق