जिल्ह्यात दिनांक २९ मार्च ते ४एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू*
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 29 मार्च सकाळी ७ ते दिनांक ४ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात संचार बंदी लागू असेल असे आदेश हिंगोली जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काढले आहेत ,संचार बंदी काळात दूध विक्री केंद्र विक्रेते यांना सकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी असेल ,तसेच संचारबंदी काळात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शासकीय कामकाजासाठी चालू राहतील ,तसेच बँक शासकीय काम व व्यापाऱ्यांच्या व्यवहारांसाठी सुरू राहतील परंतु ओळखपत्र बंधनकारक असेल, शासकीय वाहने कृषी संबंधित वाहने, व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी पेट्रोल पंप सुरू राहतील, संचार बंदी काळात वाळू उत्खननासाठी परवानगी असेल परंतु संबंधित कार्यालयाचे आदेश व ओळखपत्र बंधनकारक असेल, संचार बंदी काळात लग्न सोहळे केवळ कोर्ट मॅरेज यांना परवानगी असेल, संचारबंदी काळात महामंडळाच्या बसला हिंगोली जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी बंदी असेल, परंतु आंतर जिल्हा बसेस सुरु राहतील, संचारबंदी काळात गल्ली ,बाजार इतर कोणत्याही ठिकाणी परवानगी असलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणताही व्यक्ती आढळून आल्यास कलम १८८ साथ प्रतिबंध कायदा १८९७ व कोविड १९ कलम नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेश हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिलेत.
إرسال تعليق