*साडेदहा वाजले तरी हिंगोली तहसील कार्यालयात ना अधिकारी ना कर्मचारी...*
कामानिमित्त ज्येष्ठ महिला सकाळपासून तहसील कार्यालयात पाहत आहे अधिकाऱ्यांची वाट.....
हिंगोली: कोरोना काळात सर्व कार्यालये अनेक वेळा पूर्णक्षमतेने बंद होती. तर अनेक वेळा कार्यालयात १५ टक्के, ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहून कामे करावीत असा नियम घालण्यात आला होता. या नियमांमुळे कामचुकारपण अंगवळणी पडलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आता कार्यालय पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. असे असताना सुद्धा कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी हजर राहत नसल्यामुळे बाहेरगावाहून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे अधिकारी-कर्मचारी वेळेवर हजर नसले तरी तहसील परिसरात दररोज वेळेवर हजर असतात फक्तं दलाल
हिंगोली तहसील कार्यालयात तालुक्यातील ईडोळी येथील अभयबाई जाधव ही महिला निराधार योजनेचे अनुदान मिळत नसल्याच्या कारणावरून आज सकाळी १० वाजताच तहसील कार्यालय हिंगोली या ठिकाणी हजर झाली. परंतु साडेदहा वाजले तरी तहसील कार्यालयात अधिकारी कर्मचारी हजर नसल्याने ही महिला त्यांची वाट पाहत बसली होती. हीच परिस्थिती जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयाची आहे. हिंगोली तहसील कार्यालयात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती घेतली असता तहसील कार्यालयात दोन्ही नायब तहसीलदार यांचे कक्ष रिकामेच होते. तर समोरच्या भागात टेबलवर फक्त २ कर्मचारी काम करीत होते. इतर विभागात सुद्धा एखादा कर्मचारी बसलेला होता. हे कर्मचारी सोडले तर तहसील पूर्णपणे रिकामे होते. कर्मचारी कामावर येतच नसेल तर त्यांना वेतन का द्यायचे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
إرسال تعليق