हिंगोलीत जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते उमेद कयाधू विक्री केंद्राचे उद्घाटन

जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते उमेद कयाधू विक्री केंद्राचे उद्घाटन 

महाराष्ट्र 24 न्यूज
20 जुले 2021
उमेद कयाधू विक्री केंद्र जिल्हा परिषद हिंगोली  येथे २ मोबाईल स्टोल क्यानोपी लावण्यात आले.या धर्तीवर जिल्ह्यातील,मोठ्या गावात ग्रामपंचायत स्थरावर व  तालुक्यात तालुका स्थरावर स्वतः समुहाने असे स्टोल तयार करून उत्पादनाची विक्री करण्यात यावी असे आव्हान मुख्यकार्यकारी अधिकारी आर.बी.शर्मा यांनी केले.
  उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती  अभियान अंतर्गत इन्टेन्सिव कार्य पद्धतीने सन १ एप्रिल २०१८ पासून हिंगोली जिल्ह्यात सुरवात झाली असून या अभियाना अंतर्गत जिल्ह्यात एकून ७३०८ स्वयं सा.समुह स्थापन झाले असून या समूहामध्ये एकून ७०८३२ कुटुंब समाविष्ट झाले आहेत .या अभियाना अंतर्गत स्थापन झालेल्या समुहाने उत्पादीत केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून गाव पातळीवर तालुका स्थरावर तालुका विक्री केंद्र जिल्हा स्थरावर जिल्हास्थरीय विक्री केंद्र तयार करून त्यांच्या मार्फत समुहाने तयार केलेल्या पदार्थ व वस्तूची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदे समोर 2 मोबाईल क्यनोपी स्टोल लावण्यात आले असून एका स्टोल मध्ये तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, हिंगोली अंतर्गत कार्यरत नर्शी ना.येथील गुरुकृपा महिला बचत गटातील श्रीमती .रोहिणी गायकवाड ,पूजा ठाकूर,योगिता काकडे ,कल्पना वाघचोरे यांनी फाराळांच्या पदार्थ,व शेवाळ्या, सिरसम येथील दतकृपा समुहातील श्रीमती प्रियंका उमेश राऊत  यांनी गरम मसाला एस्वर  तयार करून विक्रीसाठी ठेवण्यात आले.
       सदरील स्टोल चे फीत कापून उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री गणाजी बेले व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आर.बी.शर्मा ,उपाध्यक्ष मनीष आखरे ,प्रकल्प संचालक धनवंत कुमार माळी   यांच्या हस्ते  करण्यात आले या प्रसंगी व जिल्हा परिषद सदस्य श्री प्रल्हाद राखोंडे, श्री संजय दराडे, श्री दिलीप देशमुख, श्री एस.पी राठोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री बोंद्रे,जिल्हा अभियान व्यवस्थापक जे.व्ही.मोडके इत्यादी सन्मानीय सदस्य व आधिकारी उपस्थित होते. सदरचे  3 मोबाईल क्यनोपी स्टोल  श्री विक्रम सारस्वत जिल्हा व्यवस्थापक MIS यांनी स्वखर्चातून  महिलांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रेरणा मिळावी म्हणून उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या बद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी व  पदाधिकारी यांनी  त्यांचे तोंडभरून कौतुक केले. 
    या कार्यक्रमास जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री जे.व्ही.मोडके ,जिल्हा व्यवस्थापक किरण गुरमे ,विक्रम सारस्वत ,राजू दांडगे व तालुका व्यवस्थापक श्रीमती स्मिता कटके सिद्धार्थ पंडित,प्रभाग समन्वयक जांबूतकर ,लोखंडे,श्रीमती चाटसे हे उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم