हिंगोली जिल्ह्यात व्यापाराच्या वतीने तीन दिवस बाजारपेठा बंद...!

भूसार व्यापाराच्या वतीने तीन दिवस बाजारपेठा बंद...!


हिंगोली जिल्हा ग्रेन मर्चंट असोसिएशन यांच्यावतीने माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान  नरेंद्र  मोदी तसेच देशाचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्यापाऱ्यांच्या विविध मागण्या बाबत निवेदन देण्यात आले.

यामध्ये मुक्त व्यापारांला परवानगी देण्यात यावी, जेणेकरून व्यापारी, आडते,धान्य उद्योजक त्यांची मानसिक स्थिती व आर्थिक स्थिती ढासळली असून  व्यापारामध्ये होणारी स्पर्धा संपुष्टात येणार असल्यामुळे शेतकरऱ्याचे  अतोनात नुकसान होणार आहे. आणि सरकारी यंत्रणावर याचा फार मोठा ताण पडणार आहे. तसेच सरकारी तिजोरीवरील बोजा पडणार आहे. त्यामुळे  स्टॉक प्रतिबंधक कायदा अधिसूचना त्वरीत मागे घेऊन मुक्त व्यापाराची शेतकरी व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात यावी. अन्यथा व्यापारी संघटनेच्या वतीने तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم