महाराष्ट्रातील बेलदार समाजाचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यास टाळाटाळ
-------------------------------------
महाराष्ट्रातील मुस्लीम बेलदार समाजाच्या लोकांना बेलदार या जातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यास महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी टाळाटाळ होत असून याकडे शासनाने लक्ष वेधण्याची मागणी बेलदार समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख खलील बेलदार यांनी एका प्रसिद्धीपत्रकात केली आहे.
महाराष्ट्रातील बीड, औरंगाबाद, पुणे, नासिक, जळगाव, नांदेड, परभणी, हिंगोली, कल्याण, ठाणे, मुंबई, अहमदनगर, यवतमाळ, वाशिम, अकोला, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर जालना नाशिक, सातारा, बुलढाणा,अहमदनगर, लातूर धुळे, अमरावती या ठिकाणच्या बेलदार समाजातील लोकांना बेलदार जातीच्या प्रमाणपत्राची जात प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. शासनाने मुस्लीम बेलदार समाजाला भटक्या जमाती मध्ये ( एंटी --२ ) या वर्गवारीत समाविष्ट केले आहे. मुस्लीम बेलदार हा पिढ्यानपिढ्या बांधकाम क्षेत्रात काम करीत आला आजही 98 टक्के समाज हा बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. बेलदार समाजाची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली असून हा समाज सामाजिक, शैक्षणिक, नोकरी, आर्थिक, राजकीय आणि औद्योगिक विकासापासून वंचित आहे. आणि म्हणूनच या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाने सदरील सवलती दिल्या आहे, परंतु शासकीय अधिकारी बेलदार समाजाला बेलदार जातीचे प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यास टाळाटाळ करीत आहे. अर्जासोबत नमुन्यात अर्ज भरून आणि संपूर्ण पुरावे देऊन सुद्धा सदरील संबंधित अधिकाऱ्यांना या समाजापासून काही आर्थिक पुराव्याची अपेक्षा असल्याचे खाजगीत बोलून दाखविण्यात येते. विनाकारण टाळाटाळ करुन आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करून जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जावर वर्षानुवर्ष विचार न करता, सदरील अर्ज कार्यालयात पडून राहतात याची दखल सुद्धा घेण्यात येत नाही. आर्थिक व्यवहार केला नाही तर अर्ज परत करण्यात येतात. समाजातील काही गरीब लोकांना मा.उच्चन्यायालया कडे धाव घेऊन पुन्हा पुन्हा अर्जावर विचार करण्याकरिता अधिकारी यांना विनवण्या करावे लागत आहे. जेव्हा की मा.उच्चन्यायालयात जाऊन आपले म्हणणे मांडून न्याय करून घेण्याची ऐपत सुद्धा बेलदार समाजात नाही. याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना कोणती दयामाया येत नाही. तरीही संबंधित अधिकारी आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय जात प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यास तयार होत नाहीत.हि एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
-------------------------------------
" कोणत्याही अर्जाचा विचार न करता आम्हाला अर्ज परत करण्याचा अधिकार आहे, शासनाने आम्हाला असे अधिकार दिलेले आहेत, आमचे कोणीही काही करू शकत नाही "
-------------------------------------
अशा पद्धतीने संबंधित अधिकारी बोलत आहेत आणि आपल्या पदाचा गैरवापर करीत आहेत. कधीकधी एकाच घरातील किंवा एकाच घराण्यातील इतर भावाचे किंवा बहिणीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करावयाचे झाल्यास आणि सख्या भावाचे किंवा बहिणीचे वैधता प्रमाणपत्र जोडलेले असल्यासही अशा अर्जावर सुद्धा संबंधित अधिकारी पैशाची मागणी करीत आहेत. आर्थिक व्यवहार झाला नाही तर कोणतेच जात प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यात येत नाही. याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी समाजातून होत आहे.आणि याचाच एक भाग म्हणून शेख खलील बेलदार यांनी प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे, की जात प्रमाणपत्र पडताळणी चे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व संबंधित जात प्रमाणपत्र समिती च्या सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती की मुस्लिम बेलदार समाजाच्या जात प्रमाणपत्रा च्या पडताळणी करिता कोणतीही टाळाटाळ करू नये. विनाकारण समाजाचे नुकसान होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. शासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी आणि मा. जात प्रमाणपत्र समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या बाबीची वेळीच दखल घ्यावी नसता आम्ही राज्यस्तरीय आंदोलन उभे करून समाजाला न्याय मिळवून देऊ कृपया याची नोंद घ्यावी.अशीही प्रतिक्रिया शेख खलील बेलदार यांनी दिली.
إرسال تعليق