दि.3.7.2021 रोजी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल या राष्ट्रीय NGO ची राज्यस्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या अध्यक्षतेखाली,राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम, प्राध्यापक फिरोज खान, प्रदेश प्रमुख महासचिव, जिल्हा अध्यक्ष तौफिक अहेमद मजीद खान यांच्या मुख्य उपस्थितीत शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे संपन्न. व दिनांक 5.7.2021 रोजी 10% मुस्लीम आरक्षणासाठी संपूर्ण जिल्ह्याभरात धरणे प्रदर्शनचे कार्यक्रम
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल या राष्ट्रीय NGO ची राज्यस्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या अध्यक्षतेखाली, प्राध्यापक फिरोज खान, प्रदेश प्रमुख महासचिव व जिल्हा अध्यक्ष तौफिक अहेमद मजीद खान यांच्या मुख्य उपस्थितीत हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्य पातळीवरील पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सर्वप्रथम राज्यातील विवीध जिल्ह्यातून आलेल्या सामाजिक स्वयंसेवकानी विराट राष्ट्रीय लोकमंचमध्ये प्रवेश घेतला. त्या सर्व स्वयंसेवकांचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यानंतर सदर बैठकीमध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय संगठन बांधणीकरिता सर्व पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त स्वयंसेवकाना (कमीत कमी 5) जोडण्यासाठी कार्य करावे असे आव्हान करण्यात आले. त्याचप्रमाणे मागील बैठकीत ठरविल्याप्रमाणे शासनाद्वारा विविध स्तरावरील घटकाकरीता घोषित केलेल्या व सुरु करण्यात आलेल्या योजनाचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवीण्यासाठी युद्धस्तरावर काम करून सर्वसामान्य व्यक्तींना सर्वतोपरी माहिती व सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर बैठकीमध्ये शासनाद्वारा मुस्लीम समाजाला यापूर्वी देण्यात आलेले 10% आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी दि.5.7.2021 रोजी हिंगोली जिल्हयामध्ये ठिकठीकाणी धरणे प्रदर्शन करण्याचे आयोजित करण्यात आले आहे आणि ईतर जिल्ह्यातील पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी सोशल मिडिया व ऑनलाईन पद्धतीने कार्य करावे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हाहन करण्यात आले आहे.
यावेळी राज्यातील विविध ठिकाणावरून नव्याने प्रवेशित केलेल्या नागपूर येथील राजेंद्र एम. पाठक, बाळू आर. मठपती, शेख शब्बीर महेबुब (तेल्हारा), अब्दुल शरीफ शाहीद (तेल्हारा), प्रकाश शिवाजी अडकीने, शेख हाजी हुसैन, शेख रहेमत अब्दुला, सय्यद अफरोज जानी, शेख शादुल युसुफ वसमत यांचे स्वागत करण्यात आले.
या बैठकीमध्ये संस्थापक अध्यक्षासह जिल्हाध्यक्ष तौफिक अहेमद, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद, प्रदेश प्रमुख महासचिव प्रा. फिरोज खान, adv सय्यद शोएब, मुजाहिद खान, सय्यद शौकत, शेख बासित, सतीश लोणकर, शेख साजिद खान, शेख आवेज, नितीन तपासे, आलम खान, रऊफ खान,मो. मुबीन, सय्यद इमाम, सागर जैस्वाल, देविदास हदवे, शेख शोएब बागबान कळमनुरी, एजाज रज्जा, साजिद खान, सय्यद असगर हाश्मी, विनोद गायकवाड, शेख हमीद , युसुफ खान, शफी पाशा मियां खान, मो. तुफेल बागबान, शेख शाहनवाज हुसैन, मो.तौफिक बागबान, आमेर अली बागबान, परवेझ, तौहीद बागबान, लतीफ वायरमन, शेख अफजल बागबान, मो.शकील बागबान, शेख अरबाज, शेख कलीम बागबान, सय्यद गौस, कलीम खान मेक्यानिक, शेख खमर, शेख जफर, वसंता कानडे, सतीश लोणकर, शेख जमीर, मो.सुफीयान, मो.आरिफ, राजेश पडघन, मो.अखील, शेख जफर बागबान, शेख मुनाफ बेलदार इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष तौफिक अहेमद मजीद खान यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून मिटिंग संपल्याचे घोषित केले. पुढील बैठक ऑगस्ट महिन्यात ठेवण्यात येणार आहे.
إرسال تعليق