हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच
जिल्ह्यातील 40 ते 50 गावांमध्ये भूकंप
झाल्याची माहिती
नांदापुर येथे आज दिवसातून पाच वेळेस जमिन हादरली ,काही धक्कादायक घटना घडण्या आधी प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे. परत 7 वाचुन 44 मिनिटांनी व 8 वाजुन 6 मिनिटांनी पुन्हा सौम्य धक्के जाणवल्याची उपसरपंच अंबादास बोरकर यांची माहिती. तसेच
काही मिनिटांपूर्वी हिंगणी गावात देखील सौम्य धक्के जाणवल्याची उपसरपंच अतुल घुगे यांनी भ्रमणध्वनीवरून माहीती दिली.
तसेच आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार खटकाळी बायपास व नर्सी फाटा या ठिकाणी सुद्धा सौम्य धक्के जाणवल्याची माहिती हाती येत आहे.
तसेच जिल्ह्यामध्ये भूकंपाची 3.4 ची नोंद झाल्याची घटना सूत्रांकडून सांगण्यात येत आहे
إرسال تعليق