समाजवादी पक्षातर्फे ना. वर्षाताई गायकवाड यांचा गौरव सत्कार

समाजवादी पक्षातर्फे ना. वर्षाताई गायकवाड यांचा गौरव सत्कार
-------------------------------------
 शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हिंगोली जिल्हा, ना.वर्षाताई गायकवाड यांना " राष्ट्रकुल संसदीय उत्कृष्ट भाषण पुरस्कार " मिळाल्याबद्दल यांचा हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाच्या वतीने पुष्पहार, शाल, आणि गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेश  महासचिव जुल्फिकार अजमी मुंबई हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे प्रदेश सचिव हाजी जफर अली धुळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मायाताई चौरे नागपूर, मुफ्ती शफिक अहमद खान रहमानी हिंगोली हे होते.
                15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव च्या पूर्वसंध्येला स्व.मौलाना नाजीर अहमद खान यांच्या स्मरणार्थ हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाच्या वतीने विधवा महिलांना मोफत शिलाई मशीन वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालक मंत्री हिंगोली जिल्हा ना. वर्षाताई गायकवाड यांना  " संसदीय राष्ट्रकुल उत्कृष्ट भाषण पुरस्कार " मिळाल्याबद्दल यांचे हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाच्या वतीने यांना शाल, पुष्पहार आणि गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मराठवाडा अध्यक्ष अब्दुल रउफ औरंगाबाद, हिंगोली जिल्हाध्यक्ष खलील बेलदार, परभणी जिल्हा अध्यक्ष, मन्सूर खान, हिंगोली जिल्हा प्रमुख महासचिव पठाण इम्रान खान, युवा जन सभेचे जिल्हाध्यक्ष शेख वाजिद, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष पठाण नजीब खान, वसमत तालुका अध्यक्ष शेख मोबीन, कळमनुरी चे तालुकाध्यक्ष, हाजी मुखीद अश्रफी, उपाध्यक्ष अफजल चौधरी, सय्यद ईमाम, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शेख खाजा, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख महासचिव सय्यद अजमत, अल्पसंख्यांक जिल्हा सचिव शेख इमतियाज, महिला, जिल्हाध्यक्ष बेबीताई जाधव, शहराध्यक्षा राधाबाई इंगोले, शेख रिजवान, समीर बाबा, शेख जैनोद्दीन, अलमास  पठाण, शमशोद्दीन चौधरी, शेख जमील बागवान, आदी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दूरदर्शन व आकाशवाणी चे निवृत्त व जेष्ठ पत्रकार डॉक्टर विजय निलावार यांनी केले तर आभार प्रदर्शन हिंगोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم