केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ भागवत कराड यांचा दौऱ्यादरम्यान वाहतूक कोंडी

केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ भागवत कराड यांचा दौऱ्यादरम्यान  वाहतूक कोंडी 

महाराष्ट्र 24 न्यूज
18 ऑगस्ट 2021

केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ भागवत कराड यांचा दौऱ्यादरम्यान सापडला वाहतूक कोंडी हिंगोलीकरांची दमछाक 

 
जन आशीर्वाद यात्रा निमित्त केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे कालपासून हिंगोली दौऱ्यावर आहेत बुधवारी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन ते निघाले असता त्यांचा ताफा येथील पीपल्स बँकेसमोर थांबला त्या मुळे रस्त्याच्या दुतर्फा जवळपास अर्धा ते पावन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर औंढा हिंगोली रस्त्यावरही हीच परिस्थिती पहावयास मिळाली. पोलीस यंत्रणेला डॉ. भागवत कराड यांचा कार्यक्रम दौरा माहीत असूनही पोलीस यंत्रणेने वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था न केल्याने हिंगोलीकर यांना नाहक त्रास सहन करावा लागला
वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक  यांची तात्काळ बदली करावी अशी वाहतूक संघटनेच्यावतीने प्रशासनाकडे   मागणीसुद्धा लवकरच केली जाईल असे अध्यक्ष यांनी सांगितले

Post a Comment

أحدث أقدم