मराठा बांधवांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे

मराठा बांधवांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे/-

 सकल मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा...!

 हिंगोली : ( प्रतिनिधी)
  मागील आठवड्यात  नांदेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणावरून मूक मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगून खोडसाळ पणाने मराठा बांधवावर गुन्हे दाखल केले. दाखल केलेले खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत यासाठी मंगळवारी (ता.२४) सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की,  नांदेड येथे  (ता.२० )मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अन्य मागन्यासाठी छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मराठा समाजाचे मुक आंदोलन करण्यात आलेले होते . आंदोलन झाल्यानंतर प्रशासनाने मराठा बांधवावर जाणीवपूर्वक सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 महाराष्ट्रामध्ये सर्वच राजकीय पक्षाने विविधि प्रकारचे मोर्चे , यात्रा , जनसंवाद यात्रा व ईतर सार्वजनिक कार्यक्रम घेतले . त्यावेळी कोणतेही गुन्हे दाखल झाले नाहीत. परंतु मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न घडता मोर्चा काढलेला असताना  पोलीस प्रशासनाने कोरोना प्रादुर्भावचे कारण दाखवून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक मराठा बांधवांच्या पुढील भविष्यातील शिक्षणावर व ईतर कामावर विपरीत परिणाम होणार असल्यामुळे तसेच अँड.गुणरत्न सदावर्ते यांनी देखील छत्रपती खासदार संभाजी महाराज यांचा अपमान करुन त्यांना अटक करा असे उच्चार केला. त्यामुळे त्यांचा निषेध मोर्चा औरंगाबाद येथे होत आहे. त्यास सर्व सकल मराठा समाजाचा पाठींबा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर पप्पू चव्हाण, कल्याण देशमुख, ऍड. अमोल जाधव, ऍड. नामदेव सपाटे, कपिल सावळे, ऍड. वैभव शिंदे, संदेश देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

 दरम्यान जिल्हाधिकारी पापळकर यांच्याकडे  सकल मराठा समाज हिंगोली च्या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील प्रलंबित मराठा वस्तीगृह त्वरित सुरू करणे, पाठी मागे मराठा आरक्षण लढ्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेणे आदी मागण्या त्वरित सोडवणूक करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी मराठा समाजाचे जिल्हास्तरावरील प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली.

Post a Comment

أحدث أقدم