नर्सीत परतवारी एकादशी निमित्त "श्री" ची महापूजा...
नर्सी नामदेव
हिंगोली जिल्ह्यातील
नर्सी येथे परतवारी एकादशी निमित्त श्री संत नामदेव महाराज यांच्या वस्त्र समाधीची ता.४ रोजी सकाळी हिंगोलीचे तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष मधुकर खंडागळे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली.
तसेच भाविक भिकाजी कदम, ओमप्रकाश हेडा, यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला.
डॉ रमेश शिंदे, डॉ.सवनेकर,नवसाजी गुगळे,खंडुजी पाटील,शाहूराव देशमुख, उत्तमराव लांभाडे,मंडळ अधिकारी गजानन पारिसकर, तलाठी नवनाथ वानोळे, कवी शिवाजी कऱ्हाळे, रामेश्वर मांडगे,कांतराव गवते,वामन मुळे, उध्दव पंडीत,सपोनि सुनील गिरी,यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान प्रतिवर्षी परतवारी एकादशीला नर्सी येथे संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविकांची गर्दी होत असते परंतु कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी तसेच यावर्षी सुद्धा प्रशासनाकडून येथील परतवारी एकादशीचा सोहळा रद्द करण्यात आल्याने हा परतवारीचा सोहळा भाविका विनाच मोजक्याच संस्थान पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री ची शासकिय महापूजा करून साजरा करण्यात आला.
إرسال تعليق