राज्यपाल भगतसिंग कोशारी शुक्रवारी हिंगोलीत
बिबिसेन जोसिले
सुधाकर मल्होत्रा
हिंगोली- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी नांदेड, हिंगोली, परभणी तीन दिवसांच्या दौऱ्यावर शासकीय कामानिमित्त येणार आहेत. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता नांदेडहून मोटारीने हिंगोली येथे दाखल होणार आहेत. तीन जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषदेचे सीईओ यांना प्राप्त झाल्याने तयारीची लगबग सुरू आहे.
दरम्यान , राज्यपाल भगतसिंग कोशारी (ता.५) ते (ता.७) या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे पाच ऑगस्ट रोजी नऊ वाजता विमानाने मुंबईहून नांदेडकडे रवाना होणार आहेत. सकाळी दहा वाजता नांदेड येथे आगमन होणार आहे. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, श्री गुरू गोबिदसिंघजी अध्यासन संकुल व रिसर्च सेंटरला भेट देऊन आढावा घेणार आहेत. तर शुक्रवारी सहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता हिंगोली येथील विश्रामगृह येथे आगमन होईल त्यानंतर सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दोन वाजता हिंगोलीवरून मोटारीने परभणी कडे रवाना होणार आहेत. शनिवारी परभणी येथील विविध विकास कामाचा आढावा घेऊन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ येथे भेट देऊन बांबू लागवड केली जाणार आहे. त्यानंतर विविध संस्थांचा आढावा घेणार आहेत. राज्यपाल यांच्या दौऱ्यामुळे तिन्ही जिल्ह्याचे प्रशासन कामाला लागल्याचे दिसून येते आहे
إرسال تعليق