लक्ष्मी लाईफ केअर च्या तरुण डॉक्टरांचे पालकमंत्र्यांनी केले तोंडभरून कौतुक
महाराष्ट्र 24 न्यूज
विविध क्षेत्रात चांगले शिक्षण घेऊन छोट्या शहरात आरोग्य सेवा देणाऱ्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल चे डॉक्टरांचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोलीत चांगलेच कौतुक केले आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सेवा केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या
शहरात नुकत्याच सुरू झालेल्या लक्ष्मी लाईफ केअर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये राज्य शासनाची जीवनदायी आरोग्य योजना सुरू झाली आहे या केंद्राचे शुक्रवारी पालक मंत्री राज्य शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले
या कार्यक्रमासाठी आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार रामराव वडकुते नगराध्यक्ष बाबाराव बांगर इंजिनीयर अशोक अग्रवाल डॉक्टर अखिल अग्रवाल उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोडारे व्यापारी महासंघाचे रमेश बगडिया अनिल नेनवानी ज्येष्ठ व्यापारी अग्रवाल विविध पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी आवर्जून हजेरी लावली होती
वर्षा गायकवाड यांनी सर्व तरुण डॉक्टरचे कौतुक करताना सांगितले की उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांचा कल मोठ्या शहराकडे किंवा प्रदेशाकडे असतो परंतु हिंगोली सारख्या लहान शहरात आरोग्य सेवा देण्याची तयारी दाखवण्या तरुण डॉक्टरांनी मोलाची कामगिरी केली आहे
शासकीय योजनेचा गरजूंना लाभ मिळावा यासाठी सर्व डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे आव्हान पालकमंत्री वर्षा ताई गायकवाड यांनी केले आहे
إرسال تعليق