कास्ट्राईब शिक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
आज दिनांक 29 आगस्ट रोजी दुपारी 2 वाजता शासकीयक विश्रामगृहात येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेची आढावा बैठक रमेश इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सहविचार संदर्भात चर्चा करण्यात आली असून याप्रसंगी हिंगोली जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदी रमेश खंदारे यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्ष पदी भिमराव तुरूकमाने यांची आणि मधुकर भालेराव यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा सचिव पदी आर.के. वाकळे, जिल्हा सहसचिव सदाशिव चाटसे, जिल्हा कोषाध्यक्ष पदी जी.एन पाईकराव, तर कार्याध्यक्ष पदी वामनराव इंगोले यांची निवड करण्यात आली असून. सल्लागार पदी भारत मोरे,आणि सी.सी.खिल्लारे यांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष सतिश कांबळे यांनी नुतन पदाधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर भालेराव यांनी केले तर आभार जी.एन.पाईकराव यांनी मानले.
إرسال تعليق