अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघां तरुणावर गुन्हा दाखल ;४१ हजाराचा मुद्देमाल जप्त

विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल ;४१ हजाराचा मुद्देमाल जप्त

हिंगोली - विनापरवाना विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी सव्वा सातच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचसकी व १९२० रुपयांची दारू  असा एकूण४१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  संजय डोरले राहुली बुद्रुक, राहुल 
गरपाळ नागझरी ता औंढा नागनाथ या दोघांनी आज सहाच्या सुमारास शहरातील जवाहर रोड जवळील  सार्वजनिक सौचालयाच्या बाजूला दोघेजण विदेशी दारूच्या बारा बॉटल ज्याची किमंत १९२०रुपये व दुचाकी  विनापरवाना बेकायदेशीर रित्या  विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ विदेशी दारूच्या बारा बॉटल आढळून आल्या. तातडीने त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांची अधिक चौकशी केली असता अवेध्य दारू विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले.पोलीस उपनिरीक्षक गंगाधर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात दोघांवर सव्वा सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडीत  कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Post a Comment

أحدث أقدم