कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा

कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे गणेशमंडळांना आवाहन

हिंगोली -  मागील वर्षी प्रमाणे यंदाही  येणारा गणेशोत्सव गणेश मंडळाने कोरोनाचे नियम पाळत साधेपणाने साजरे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बुधवारी 
आगामी सण उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली  गणेशोत्सव संदर्भात  बैठक पार पडली .पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी,
जिल्हा परिषदेचे सीईओ संजय दैने, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह महसूल अधिकारी, ठाणेदार यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरोना नियमांचे पालन करून आगामी सण-उत्सव साजरे करावेत असे आवाहन केले. कोरोनाच्या दोन लाटांचा अनुभव सर्वांना आहे, त्यामुळे काय खबरदारी घ्यावी, सन उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन कसे करावे याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.तसेच पीओपी ऐवजी शाळूच्या गणपतीची स्थापना करावी, आरती ही ऑनलाइन केल्यास घटनास्थळी स्वछता राखण्यास मदत होईल, कोविड प्रादुर्भाव यावर नियंत्रण ठेवता येईल. पालिकेने विसर्जनाच्या वेळी ठिकठिकाणी मागील वर्षी प्रमाणे ट्रॅक्टर ठेवून त्यात विसर्जन करावे, तिसऱ्या लाटेची श्यक्यता पाहता प्रत्येकाने मास्क ,सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक कलासागर यांनी शासकीय नियमावलीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे सांगितले, तर चंद्रकांत सूर्यवंशी, यशवंत काळे यांनी ही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन उदय खंडेराय यांनी केले तर यतीश देशमुख यांनी आभार मानले. यावेळी महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم